Best Books for Success in Life – यशस्वी जीवनासाठी वाचायलाच हवी अशी ५ पुस्तके!

Best Books for Success in Life

Best Books for Success in Life

Best Books for Success in Life – यशस्वी जीवनासाठी वाचायलाच हवी अशी ५ पुस्तके!

तुमच्या डोक्यात हा प्रश्न कधी आला आहे का?

“मी काहीतरी मोठं करू शकतो, पण कुठून सुरुवात करावी?”

“यशस्वी लोक वेगळं काय करतात?”

Best Books for Success in Life : ही काही प्रश्नं आहेत, जी अनेक महत्त्वाकांक्षी लोकांना सतत सतावतात. तुम्ही एखाद्या मोठ्या स्वप्नाबद्दल विचार करत असाल, तुमच्याकडे मोठ्या संधी असतील, पण त्या योग्य दिशेने कशा न्यायच्या, हेच कळत नसेल. प्रयत्न तर खूप करतोय, पण मनासारखं यश का मिळत नाही? हा विचार तुम्हाला कधी त्रास देतो का? जर हो, तर तुम्ही एकटे नाही आहात!

इतिहासातील यशस्वी लोकांचा अभ्यास केला, तर एक गोष्ट लक्षात येते. ते केवळ परिस्थितीवर अवलंबून राहत नाहीत, तर स्वतःला घडवण्यासाठी सतत नवीन ज्ञान मिळवत राहतात. हे ज्ञान त्यांना त्यांच्या पूर्वीच्या चुकांपासून शिकवते, त्यांची विचारसरणी बदलते आणि त्यांना मोठ्या निर्णयांसाठी सक्षम बनवते. पण हे ज्ञान मिळवायचं कुठून? उत्तर एक योग्य पुस्तके वाचून!

लोक म्हणतात, “यशस्वी लोक पुस्तकं वाचतात.” पण खरी गोष्ट ही आहे की, ते योग्य पुस्तकं निवडून वाचतात. चुकीची पुस्तकं तुमचा वेळ वाया घालवू शकतात, पण योग्य पुस्तकं तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे नवीन दिशा देऊ शकतात.

Best Books for Success in Life

आज मी तुम्हाला अशा ५ अद्भुत पुस्तकांची ओळख करून देणार आहे, जी तुमच्या आयुष्याचा गेम बदलू शकतात. पण थांबा! फक्त वाचून उपयोग नाही. या पुस्तकांतून मिळणाऱ्या ज्ञानाची अंमलबजावणी झाली पाहिजे. नाहीतर ते फक्त शब्द राहतील आणि तुमच्या जीवनात काहीही बदल होणार नाही.

तयार राहा, कारण पुढच्या काही मिनिटांत तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे, जी तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या स्तरावर नेऊ शकते! चला मग सुरुवात करूया!

१. “Rich Dad Poor Dad” – रॉबर्ट कियोसाकी

कल्पना करा, तुमच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या विचाराचे वडील आहेत.

पहिला वडील, जो तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्या भल्याचा विचार करतो आणि म्हणतो, “बेटा, चांगलं शिक्षण घे, चांगल्या मार्कांनी पास हो, मोठ्या कंपनीत स्थिर नोकरी मिळव आणि आयुष्यभर सुरक्षित राहा.”

दुसरा वडील, जोही तुमच्या भल्याचाच विचार करतो, पण तो सांगतो, “शिक्षण महत्वाचं आहे, पण फक्त शालेय शिक्षण पुरेसं नाही. तुला पैशाचं शिक्षणही घ्यायला हवं. पैसा कसा काम करतो, कसा गुंतवला जातो, तो वाढवायच्या पद्धती काय आहेत हे शिकलं नाहीस, तर तुला आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करावं लागेल!

हे दोघंही तुमच्या भल्याचाच विचार करत आहेत. पण कोणता मार्ग निवडायचा, हे तुमच्या हातात आहे. पहिल्या प्रकारच्या वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर कित्येक लोक जातात आणि आयुष्यभर नोकरीच्या पिंजऱ्यात अडकून राहतात. त्यांच्या संकल्पनांनुसार, यश म्हणजे एक चांगली नोकरी मिळवणं, महिना अखेरीस पगार मिळणं, आणि सुरक्षित जीवन जगणं. पण त्याचबरोबर त्यांना ही भीतीही असते की, “कधी नोकरी गेली तर काय?” “पगार वाढला नाही तर कसं होईल?” “नवीन आर्थिक संकट आलं, तर कसं निभावून न्यायचं?”

याउलट, दुसऱ्या प्रकारचे वडील ‘श्रीमंत वडील’ तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवतात. त्यांचं म्हणणं असतं की, पैसा ही एक संकल्पना आहे आणि त्याचा योग्य वापर केला, तर तो सतत वाढत राहतो. ते सांगतात की, “नोकरीच्या मर्यादा ओलांडून बिझनेस, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करायची कला शिकली पाहिजे!” श्रीमंत लोक कधीही फक्त नोकरीच्या पगारावर अवलंबून राहत नाहीत. ते पैसे कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी शोधतात आणि त्यात गुंतवणूक करून आपली संपत्ती वाढवतात.

या पुस्तकातून शिकण्यासारखं:

  1. पैसा कसा काम करतो, हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे. जर पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल, तर तुम्ही आयुष्यभर पैशासाठी काम करत राहाल.
  2. संधी फक्त नोकरीपुरत्या मर्यादित नाहीत बिझनेस, गुंतवणूक, स्टॉक्स, रिअल इस्टेट आणि इतर अनेक मार्गांनी पैसा वाढवता येतो.संधी फक्त नोकरीपुरत्या मर्यादित नाहीत बिझनेस, गुंतवणूक, स्टॉक्स, रिअल इस्टेट आणि इतर अनेक मार्गांनी पैसा वाढवता येतो.
  3. गरीब लोक आणि श्रीमंत लोक पैशाचा विचार कसा करतात, यामध्ये प्रचंड मोठा फरक असतो. गरीब लोक पैसा मिळवतात आणि खर्च करून टाकतात, तर श्रीमंत लोक पैसा मिळवतात आणि तो वाढवण्यासाठी गुंतवतात.

आता विचार करा तुमच्या आजपर्यंतच्या आर्थिक सवयी कशा आहेत?

तुम्ही दर महिना फक्त पगाराच्या पैशावर जगताय का? तुम्ही मिळवलेल्या पैशातून काही भाग गुंतवता का? पैसा मिळवणं हे एक कौशल्य आहे, आणि तो योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणं ही कला आहे. जर तुम्ही ही कला शिकली नाही, तर आयुष्यभर फक्त पैशाच्या मागे धावावं लागेल.

कधी तरी तुमच्या मनात हा विचार आला आहे का?

मी दिवस-रात्र मेहनत करतो, पैसे मिळवतो, पण तरीही ते टिकत नाहीत!

मी कितीही पैसे मिळवले, तरी मला आर्थिक स्थैर्य मिळत नाही!

मी माझ्या कुटुंबासाठी चांगलं आयुष्य जगायचं स्वप्न पाहतो, पण त्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे?

जर तुमच्या मनात असे विचार आले असतील, तर ‘Rich Dad Poor Dad’ हे पुस्तक तुम्हाला नेमका दोष कुठे आहे, हे स्पष्ट करेल. हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर ती तुमच्या विचारसरणीला बदलण्यासाठी तयार केलेली योजना आहे.

२. “The 10X Rule” – ग्रँट कार्डोन

“अरे यार, मी खूप मेहनत करतो, पण तरीही माझं यश मर्यादितच राहतं…”

हे तुमचंही वाक्य आहे का? तुम्ही तुमचं १००% देताय, पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत? तुम्हाला वाटतं की, “मी एवढं काही करतोय, तरीही माझा बिझनेस मोठा का होत नाही?” किंवा “करिअरमध्ये पुढे जायचंय, पण काहीतरी अडतंय…”

जर हा विचार तुमच्या मनात आला असेल, तर हीच वेळ आहे विचारसरणी बदलण्याची!

‘१०X’ म्हणजे नेमकं काय?

‘१०X’ म्हणजे तुमच्या स्वप्नांची, तुमच्या मेहनतीची आणि तुमच्या कृतींची पातळी दहा पट वाढवणं. ही एक मानसिकता आहे, जी तुम्हाला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन जाते.

तुमचं ध्येय खूप मोठं ठेवा

जर तुमचं ध्येय लहान असेल, तर त्यातून मिळणारे परिणामसुद्धा मर्यादित असतील. तुम्ही ज्या प्रमाणात विचार करता, त्याच प्रमाणात तुम्हाला संधी मिळतात. जर तुमचं ध्येय १ लाख रुपये कमवायचं असेल, तर तुम्ही त्या प्रमाणातच योजना तयार कराल. पण जर तुमचं ध्येय १० लाख रुपये कमवण्याचं असेल, तर तुमची मानसिकता आणि तुमच्या कृती पूर्णपणे वेगळ्या स्तरावर जातील!

संधी समोर असताना संकोच करू नका, ती दहा पट पकडा!

कधी तुम्ही मोठ्या संधींना फक्त यासाठी सोडून देता, कारण तुम्हाला भीती वाटते? “हे माझ्यासाठी नाही…” “मी यात यशस्वी होईल का?” “इतका मोठा धोका पत्करायचा?” यशस्वी लोक याच वेळी वेगळा विचार करतात. ते मोठ्या संधींना दहा पट वेगाने पकडतात, कारण त्यांना माहिती असतं की, यश मिळवायचं असेल, तर जोखीम घ्यावीच लागेल.

तुमच्या बिझनेस किंवा करिअरमध्ये १०X लेव्हलची मेहनत टाका.

सामान्य मेहनत केली, तर सामान्य निकाल मिळतो. पण जेव्हा तुम्ही १०X प्रमाणात मेहनत करता, तेव्हा स्पर्धा आपोआप संपते. कारण बहुतांश लोक फक्त सरासरी प्रयत्न करत असतात. तुमचं बिझनेस ग्रोथ, तुमचं मार्केटिंग, तुमची सेल्स हे सगळं दहा पट अधिक केलं, तर तुम्हाला यश मिळणं अटळ आहे!

तुमच्या यशाला १०X वेगाने वाढवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा.

३. “The Magic of Thinking Big” – डेव्हिड श्वार्ट्झ

(मोठं स्वप्न बघणाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली!)

“माझा जन्म सामान्य घरात झाला आहे. मी फार मोठं काही करू शकत नाही…”हा विचार तुम्ही किती वेळा केला आहे?किती वेळा स्वतःला कमी समजलं आहे?किती वेळा स्वप्न पाहायच्या आधीच, “हे माझ्यासाठी नाही!” असं स्वतःलाच समजावलं आहे?

जर तुम्ही असे विचार कधी केले असतील, तर आजच त्यांना मनातून काढून टाका! कारण तुमची पार्श्वभूमी, शिक्षण, किंवा सध्याची परिस्थिती या कशाचाही तुमच्या यशावर परिणाम होत नाही.

डेव्हिड श्वार्ट्झ सांगतात की, मोठं विचार करणं हीच यशस्वी लोकांची खरी ओळख असते.सामान्य लोक म्हणतात “माझ्यासाठी छोटंसं घर आणि छोटंसं सुखी आयुष्य पुरेसं आहे.”पण जे मोठं विचार करतात, ते म्हणतात ” मोठं यश मिळवीन, मोठं जीवन जगीन आणि इतरांनाही मोठं बनवेन!”

‘The Magic of Thinking Big’ मधून शिकण्यासारखं:

स्वतःवर शंका घेणं थांबवा.

“मी हे करू शकतो का?” “माझ्याकडे पुरेसं टॅलेंट आहे का?” “माझं नशीब मला साथ देईल का?” हे सगळे प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आले असतील. पण, तुम्ही महान गोष्टींसाठी जन्म घेतला आहे. ज्याच्यावर विश्वास असतो, तोच यश मिळवतो.ज्याला स्वतःच्या क्षमतांवर शंका असते, तो कायम मागेच राहतो. तुम्ही जे करू शकता, त्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला मोठ्या संधींसाठी तयार करा.

अपयश हा अंत नाही, ती सुरुवात आहे!

स्टीव्ह जॉब्सला त्याच्याच कंपनीतून काढून टाकलं. धीरूभाई अंबानी एका छोट्या नोकरीतून सुरुवात केली. जॅक मा ३० वेळा नोकरीसाठी रिजेक्ट झाला. त्यांनी हार मानली असती, तर आज त्यांची नावं मोठ्या यशस्वी लोकांमध्ये आली असती का? अपयश म्हणजे तुमच्या यशाचा शेवट नव्हे, तर एका नव्या सुरुवातीची नांदी आहे.

तुम्हाला जे हवं आहे, त्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यासाठी मोठ्या कृती करा. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्यासाठी कृती करणं कठीण. मोठं यश मिळवण्यासाठी, तुमच्या इच्छाशक्तीइतकीच तुमची कृती मोठी असावी लागते.

‘The Magic of Thinking Big’ सांगतं:”तुमचं विचार करण्याचं प्रमाण मोठं ठेवा, कृती मोठी ठेवा आणि तुम्हाला मिळणाऱ्या यशाचं प्रमाणही मोठं असेल!”

४. “How to Win Friends and Influence People” – डेल कार्नेगी

(लोकांना प्रभावीपणे कसे जिंकायचे?)

तुम्ही किती वेळा अनुभव घेतला आहे की,

तुमच्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे, पण लोकांना समजावताच येत नाही.

तुमचं व्यक्तिमत्त्व चांगलं आहे, पण लोक तुमच्या वर लक्ष देत नाहीत.

तुम्ही कष्ट करताय, पण योग्य लोकांची साथ मिळत नाही.

यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे फक्त टॅलेंट किंवा स्किल असणं पुरेसं नाही. लोकांशी जोडला जाणं, प्रभावी संवाद साधणं आणि लोकांना जिंकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

बिझनेस करायचा आहे, पण लोकांशी संवाद साधायचा आत्मविश्वास नाही…”ही समस्या तुमच्याकडे आहे का?

डेल कार्नेगी सांगतात की, “यशस्वी होण्यासाठी इतर लोकांचा पाठिंबा मिळणं महत्त्वाचं आहे. आणि हा पाठिंबा मिळवण्यासाठी, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायला शिकायला हवं!”

डेल कार्नेगी सांगतात, “तुम्ही लोकांशी संवाद कसा साधता, यावर तुमच्या संधी अवलंबून असतात!”तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही साधे बदल केले, तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा केली, आणि लोकांना समजून घेण्याची कला आत्मसात केली तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी प्रभाव टाकू शकता.

“How to Win Friends and Influence People” मधून शिकण्यासारखं:

लोकांसोबत जुळवून घ्या, मगच तुम्हाला संधी मिळतील : लोक तुमच्याशी जोडले गेले, तर ते तुमच्यावर विश्वास ठेवतील. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील, तर ते तुमच्या संधींचा भाग बनतील.आणि लोक तुमच्या सोबत आले, तर तुमचं यश वेगाने वाढेल!

तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेत : तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमची बोलण्याची शैली, तुमच्या शब्दांची निवड सगळं महत्त्वाचं आहे.तुमचं संभाषण लोकांना आकर्षित करायला हवं.

उदाहरणार्थ, तुम्हाला कोणी विचारलं “तुम्ही काय करता?” तर तुम्ही एकदम बोअरिंग उत्तर दिलं. “मी व्यवसाय करतो.” हे ऐकून लोक पुढे बोलणार नाहीत! पण जर तुम्ही म्हणाले “मी असा व्यवसाय करतो, ज्यामुळे लोक पैसे कमवू शकतात! “तर समोरच्या व्यक्तीला उत्सुकता निर्माण होईल आणि तो अधिक जाणून घेण्यासाठी पुढे बोलेल.

नेहमी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करा : “माझा फायदा काय?” असा विचार प्रत्येक जण करतो. पण तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय मिळवून देऊ शकता, हे विचारलं तर? डेल कार्नेगी सांगतात लोकांना काय हवंय, हे ओळखा आणि त्यांना ते द्या! व्यवसायात, नोकरीत, नातेसंबंधात हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

पण फक्त लोकांना जिंकून उपयोग नाही! यशस्वी होण्यासाठी, तुमचं मानसिक स्टॅमिना मजबूत असायला हवं. पुढील पुस्तक तुम्हाला मानसिक ताकद कशी वाढवावी हे शिकवेल!

५. “Atomic Habits” – जेम्स क्लिअर

(छोट्या सवयींमधून मोठं यश मिळवायचं असेल, तर हे पुस्तक वाचा!)

आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एक मोठा संकल्प करण्याची गरज नाही, तर लहानसं पण योग्य पाऊल उचलणं जास्त प्रभावी ठरतं.

संकल्प करा, मी उद्यापासून सकाळी ५ ला उठणार!तुम्ही रात्री उत्साहाने ठरवता, बस्स, आता आयुष्य बदलेल! पण दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता घड्याळ अलार्म वाजतो. तुम्ही अलार्म बंद करता आणि… परत झोपता. जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा ७ वाजलेले असतात चला, आता काही उपयोग नाही. उद्यापासून नक्की! आणि हा “उद्यापासून” कधीच येत नाही…

“सवयीचं सामर्थ्य” – जेम्स क्लिअर सांगतात…

जेम्स क्लिअर यांनी संशोधन करून सिद्ध केलंय की, मोठं यश मिळवायचं असेल,तर एकदम मोठे बदल करण्यापेक्षा, छोट्या चांगल्या सवयी लावणं जास्त प्रभावी असतं.

यशस्वी लोक एकाच वेळी प्रचंड मेहनत करत नाहीत,ते दररोज १% सुधारणा करत जातात. जर तुम्ही दररोज फक्त १% सुधारणा केली, तर एका वर्षाच्या शेवटी तुम्ही ३७ पट चांगले व्हाल! विचार करा,जर तुम्ही रोज १% चांगले होण्याचा संकल्प केला,तर तुमचं एक वर्षानंतरचं आयुष्य किती वेगळं असेल?

“Atomic Habits” मधून शिकण्यासारखं:

1% सुधारणा नियम: जर तुम्ही रोज फक्त १% चांगले होण्याचा प्रयत्न केला, तर एका महिन्यात तुम्हाला मोठा बदल जाणवेल. छोट्या बदलांमुळे मोठे परिणाम मिळतात.

सवयींची साखळी बनवा: नव्या सवयी लावायच्या असतील, तर त्या आधीच्या सवयींसोबत जोडा. उदाहरणार्थ,”चहा घेतल्यावर मी ५ मिनिटं पुस्तक वाचणार.” “फोन चार्जिंगला लावला की मी १० पुशअप्स करणार.”

तुमच्या आयुष्याला यशस्वी वळण द्यायचंय?तर या पुस्तकांमधून मिळालेलं ज्ञान फक्त वाचू नका, ते अंमलात आणा! तुमच्या यशाचा सुरुवात आजपासूनच करा!

तुम्ही या ब्लॉगमध्ये ५ शक्तिशाली पुस्तकांबद्दल वाचलं, ज्यांनी कोट्यवधी लोकांचं आयुष्य बदललं आहे. पण फक्त वाचून काहीच होणार नाही!

तर ही पुस्तके तुमच्या रक्तात भिनू द्या, आणि कृती करा!

उद्यापासून नव्हे, आजपासून सुरुवात करा. कारण यशस्वी लोक ‘उद्याचा’ विचार करत नाहीत, ते ‘आज’ कृती करतात!

तुमच्या यशाच्या प्रवासाला शुभेच्छा!💡 तुम्ही कोणतं पुस्तक पहिलं वाचणार? खाली कमेंटमध्ये लिहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *